हे गाव आहे जगातील सर्वात थंड ठिकाण; उणे ५० अंश तापमानातही थांबत नाही इथले जनजीवन
बातमी विदेश

हे गाव आहे जगातील सर्वात थंड ठिकाण; उणे ५० अंश तापमानातही थांबत नाही इथले जनजीवन

ओम्याकोन : गेल्या एका आठवड्यापासून उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे आहे. यामुळे तेथील लोकांनी घरांमध्ये स्वत: ला पॅक केले आहे. तर दुसरीकडे, यावर्षी थंडीची मोठी लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतासह जगातील बऱ्याच शहरांमध्ये तापमान उणे अंशांपर्यंत जाते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पण तुम्हाला माहित आहे का, की जगात असे एक गाव आहे जेथे किमान तापमान -71 डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचते? मात्र ततीही तेथील जनजीवन सुरळीत पाने चालु असते. हो, असे एक गाव आहे जिथे तापमान -71 डिग्री सेल्सियस तापमनातही जनजीवन सुरळीतपाने सुरु असते. हे गाव आहे रशियामधील सायबेरियातील ओम्याकोन गाव. ओम्याकोन गाव हे अंटार्क्टिका बाहेर जगातील सर्वात थंड ठिकाण मानले जाते. येथे सरासरी तपमान सुमारे -50 अंश आहे.

1924 मध्ये या ओम्याकोन गावाचे तापमान -71.2 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले होते. 2018 च्या आकडेवारीनुसार येथे 500 ते 900 लोक राहतात. या लोकांवर नेहमीच फ्रॉस्टबाइट किंवा दंव पडण्याचा धोका असतो.

कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी मुलांना तापमानानुसार कठोर बनवले जाते. येथे उणे 50 अंश तापमानात मुले शाळेत जातात. पण जेव्हा तापमान आणखी कमी होऊ लागते तेव्हा शाळा येथे बंद केल्या जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, येथे डिसेंबर महिन्यात सुमारे दहा वाजता सूर्य उगवतो. अशा परिस्थितीत थंडीमुळे लोकांची अवस्था फारच बिकट होते. तर गाड्यांच्या बॅटरीमध्ये बर्फ साठू नये यासाठी गाड्या नेहमीच चालू स्थितीत ठेवाव्या लागतात.

हिवाळ्यात या गावात कोणतेही पीक घेतले जात नाही. लोक बहुधा वेगवेगळ्या प्रकारचे मांस खाऊन जगतात. रेनडिअर आणि हार्स मास व्यतिरिक्त, लोक स्ट्रॉगॅनिना माशाचे भरपूर सेवन करतात.