केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सुटीच्या दिवशीही मिळणार लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सुटीच्या दिवशीही मिळणार लस

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेतला असून देशात दुसरी लाट आल्यानंतर केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सर्व शासकीय आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच केलेल्या घोषणेनुसार देशभरात ४५ वर्षांपुढील सर्वांसाठी आजपासून लसीकरण सुरू झालं आहे. आतापर्यंत कोरोनायोद्धे, सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील व्यक्ती तसेच ६० वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण केले जात होतं. आता मध्यमवयीन व्यक्ती कोरोनाबाधित होण्याचं प्रमाण प्रचंड असल्यानं लसीकरणाचा विस्तार करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता.

वाढत्या लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लशींचा राज्यांना पुरेसा आणि वेळेवर पुरवठा केला जाईल, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. लसीकरणाचा वेग वाढला तरी लशीचा तुटवडा निर्माण होऊ दिला जाणार नाही. राज्यांनी लसीकरणाची अद्ययावत आकडेवारी केंद्राला देणं गरजेचं असून, त्यानुसार लशींचा पुरवठा केला जाईल, असंही केंद्रानं राज्यांना म्हटलं आहे.