मोठी बातमी! लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम
देश बातमी

मोठी बातमी! लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी होत आहे. अशात कोरोना लसीकरणाच्या बाबतीत देशानं शुक्रवारी नवा विक्रम रचला आहे. शुक्रवारी देशभरात 1 कोटी 64 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आज देशाचं एक कोटी दैनंदिन लसीकरणाचं टार्गेट पूर्ण झालं. या यशासाठी लस […]

दिलासादायक ! देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या चार लाखांच्या खाली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या चार लाखांच्या खाली

नवी दिल्ली : देशात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या ४० हजारांच्या जवळपास आढळत आहे. मंगळवारी देशात ३८ हजार ३५३ कोरोनाबाधित आढळले असून ४९७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाखांच्या खाली आली असून देशात ३ लाख ८६ हजार ३५१ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या १४० दिवसांतील ही सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे. […]

नवीन कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घट; मात्र, लसीकरणाचा मंदावला वेग
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नवीन कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घट; मात्र, लसीकरणाचा मंदावला वेग

नवी दिल्ली : देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेचा वेग काहीसा मंदावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या गतीने जर लसीकरण होत राहिलं तर देशाचं लसीकरणाचं लक्ष्य गाठणं अवघड होणार असल्याचं चित्र दिसत आहे. जुलै महिन्यात १३ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य देशासमोर आहे. मात्र, या महिन्याभरात म्हणजे गेल्या रविवारपर्यंत ९.९४ कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं […]

महाराष्ट्राची लसीकरणात आघाडी; १ कोटी नागरिकांनी घेतले दोन्ही डोस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

महाराष्ट्राची लसीकरणात आघाडी; १ कोटी नागरिकांनी घेतले दोन्ही डोस

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता एक कोटींहूनही अधिक झाली आहे. अशा प्रकारचा विक्रम करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं आणि एकमेव राज्य ठरलं आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात […]

दिलासादायक ! लसीकरणाचा आकडा ३५कोटींच्या पार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! लसीकरणाचा आकडा ३५कोटींच्या पार

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून देशातील लसीकरणाचा आकडा ३५ कोटींच्या पार गेला आहे. देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने वेग घेतला आहे. भारतात आतापर्यंत ३५ कोटी अधिक करोना लशीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. आतापर्यंत भारतात एकूण ३५ […]

लसीकरणात महाराष्ट्र पुन्हा अव्वल! एका दिवसात आठ लाखांचा टप्पा पार
बातमी महाराष्ट्र

लसीकरणात महाराष्ट्र पुन्हा अव्वल! एका दिवसात आठ लाखांचा टप्पा पार

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने लसीकरणाचा उच्चांक कायम राखला आहे. काल (ता. ०४) समोर आलेल्या आकडेवारीनुासर हे स्पष्ट होत आहे की, महाराष्ट्राने लसीकरणाच्या बाबतीत आपलं आघाडीचं स्थान कायम राखलं आहे. राज्यात काल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ७ लाख ८५ हजार ३११ लाभार्थ्यांनी लस घेतली. ही एका दिवसातली सर्वाधिक आकडेवारी आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाच्या […]

लसीकरण हाच कोरोना नियंत्रणावर सर्वोत्तम उपाय
बातमी विदेश

लसीकरण हाच कोरोना नियंत्रणावर सर्वोत्तम उपाय

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख डॉ. टेद्रोस अडानोम गेब्रेयिसस यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून गुरुवारी चिंता व्यक्त केली. लसीकरण हाच कोरोना महासाथीवरील नियंत्रणाचा आणि जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा सर्वोत्तम उपाय असल्यामुळे प्रत्येक देशातील किमान १० टक्के लोकांचे सप्टेंबरपर्यंत लसीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. लशींच्या पुरवठ्याबाबत फार मोठ्या प्रमाणावर असमानता आढळून येत आहे. काही […]

मोठी बातमी ! लसीकरणात भारत पहिल्या स्थानावर; अमेरिकेलाही टाकले मागे
देश बातमी

मोठी बातमी ! लसीकरणात भारत पहिल्या स्थानावर; अमेरिकेलाही टाकले मागे

नवी दिल्ली : २१ जूनपासून भारतात १८ ते ४४ या वयोगटासाठी केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढला असून पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आलं होतं. ताज्या आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात आज २८ जून २०२१ रोजी सकाळी […]

देशात संपूर्ण लसीकरणासाठी लागणार एवढे दिवस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात संपूर्ण लसीकरणासाठी लागणार एवढे दिवस

नवी दिल्ली : भारतात सोमवारी ८५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले. ही संख्या ५ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या लसीकरणाच्या जवळपास दुप्पट आहे. या नव्या विक्रमामुळे भारतात ऑगस्ट महिन्यापर्यंत दररोज एक कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दररोज जर ७५ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले तर १८ वर्षांवरील सर्व प्रौढांचे म्हणजे ९४.०२ […]

मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे; पहिला डोस ८२ तर दुसरा डोस ९५ टक्के प्रभावी
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे; पहिला डोस ८२ तर दुसरा डोस ९५ टक्के प्रभावी

नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एपिडिमोलॉजीच्या नव्या विश्लेषणानुसार कोविड १९ लसीचा एक डोस मृत्यूपासून बचाव करण्यासाठी प्रभावी असल्याचे समोर आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर ही शक्यता ८२ टक्के तर दुसऱ्या डोस नंतर ९५ टक्के असल्याचे या विश्लेषणात म्हटले आहे. तामिळनाडूमधील अति जोखमीच्या गटांमधील मृत्यू रोखण्यासाठी कोविड -१९ लसीच्या प्रभावाचा हा […]