लसीकरणात भारताचा नवा उच्चांक; WHOकडून कौतुक
देश बातमी

लसीकरणात भारताचा नवा उच्चांक; WHOकडून कौतुक

नवी दिल्ली : लसीकरणात भारताने नवा उच्चांक गाठला आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे ७५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली असून याबाबत WHOकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे. मनसुख मांडविया म्हणाले, ‘जर याच वेगात लसीकरण सुरु राहिले तर डिसेंबरपर्यंत देशातील ४३ टक्के लोकांचे लसीकरण पुर्ण होईल. […]

मोठी बातमी! लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम
देश बातमी

मोठी बातमी! लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी होत आहे. अशात कोरोना लसीकरणाच्या बाबतीत देशानं शुक्रवारी नवा विक्रम रचला आहे. शुक्रवारी देशभरात 1 कोटी 64 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आज देशाचं एक कोटी दैनंदिन लसीकरणाचं टार्गेट पूर्ण झालं. या यशासाठी लस […]

लसीकरणात महाराष्ट्राने केली विक्रमी कामगिरी; ५ कोटींचा टप्पा पार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लसीकरणात महाराष्ट्राने केली विक्रमी कामगिरी; ५ कोटींचा टप्पा पार

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने विक्रमी कामगिरी केली आहे. आज सायंकाळी सहापर्यंत दिवसभरात ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. १४ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० […]

दिलासादायक ! देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या चार लाखांच्या खाली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या चार लाखांच्या खाली

नवी दिल्ली : देशात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या ४० हजारांच्या जवळपास आढळत आहे. मंगळवारी देशात ३८ हजार ३५३ कोरोनाबाधित आढळले असून ४९७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाखांच्या खाली आली असून देशात ३ लाख ८६ हजार ३५१ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या १४० दिवसांतील ही सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे. […]

मोदी सरकारची धूळफेक; मोफतऐवजी केवळ ३५% मोफत, तर ६५% विकत लसीकरण
पुणे बातमी

मोदी सरकारची धूळफेक; मोफतऐवजी केवळ ३५% मोफत, तर ६५% विकत लसीकरण

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात (२१ जून पासून) १८ वर्षापुढील सर्वांना ७५% लसीकरण, मोफत करण्याचे धोरण जाहीर केले. मात्र सरकारी मोफत लसीकरण केंद्रावर लसींचा पुरवठा, केंद्र सरकार अतिशय तोकडेपणाने करत असल्याचे समोर आले असून आले असून, केंद्राच्या वाट्याच्या ७५% मोफत लसी पुरवण्यात मोदी सरकार कमी पडत आहे व एक प्रकारे टाळाटाळ सुरू असल्याचेच दिसत […]

लसीचा दुष्काळ संपणार! मोदी सरकारने दिली आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर
देश बातमी

लसीचा दुष्काळ संपणार! मोदी सरकारने दिली आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर

नवी दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने चांगला वेग घेतला आहे. आत्तापर्यंत जवळपास ४० कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आता मोदी सरकारने आणखी लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर ठरणार आहे. लवकरच देशाला लसींचे ६६ कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे तब्बल १४ हजार […]

दिलासादायक! देशात ४ महिन्यांतील निचांकी कोरोनाबाधितांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! देशात ४ महिन्यांतील निचांकी कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत आहे. सध्याची आकडेवारी पाहता देशवासियांना थोडा दिलासा मिळाला आहे. देशात मागील २४ तासांत दिवसभरात गेल्या ४ महिन्यांतील सर्वात कमी बाधित आढळले तर उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. देशात काल दिवसभरात ३१ हजार ४४३ नव्या बाधितांची नोंद झाली. गेल्या ११८ दिवसातली ही सर्वात कमी […]

दिलासादायक ! लसीकरणाचा आकडा ३५कोटींच्या पार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! लसीकरणाचा आकडा ३५कोटींच्या पार

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून देशातील लसीकरणाचा आकडा ३५ कोटींच्या पार गेला आहे. देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने वेग घेतला आहे. भारतात आतापर्यंत ३५ कोटी अधिक करोना लशीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. आतापर्यंत भारतात एकूण ३५ […]

लसीकरणात महाराष्ट्र पुन्हा अव्वल! एका दिवसात आठ लाखांचा टप्पा पार
बातमी महाराष्ट्र

लसीकरणात महाराष्ट्र पुन्हा अव्वल! एका दिवसात आठ लाखांचा टप्पा पार

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने लसीकरणाचा उच्चांक कायम राखला आहे. काल (ता. ०४) समोर आलेल्या आकडेवारीनुासर हे स्पष्ट होत आहे की, महाराष्ट्राने लसीकरणाच्या बाबतीत आपलं आघाडीचं स्थान कायम राखलं आहे. राज्यात काल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ७ लाख ८५ हजार ३११ लाभार्थ्यांनी लस घेतली. ही एका दिवसातली सर्वाधिक आकडेवारी आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाच्या […]

महाराष्ट्राने केली केंद्राकडे अधिकच्या एवढ्या लसींची मागणी
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्राने केली केंद्राकडे अधिकच्या एवढ्या लसींची मागणी

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात महाराष्ट्राला १ कोटी १५ लाख लसींचे डोस देण्यात येणार आहेत. मात्र लसीकरणाची महाराष्ट्राची क्षमता व नियोजन लक्षात घेता राज्याला अधिकचे दीड कोटी डोस देण्याची मागणी आरोग्य विभागाने एका पत्राद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत तीन कोटी तीस लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. केंद्र सरकारने अखंडित […]