पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार; चक्रीवादळाचा रुद्रावतार
बातमी महाराष्ट्र

पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार; चक्रीवादळाचा रुद्रावतार

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं काल दुपारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. पाकिस्तानने या चक्रीवादळाचं ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नामकरण केलं आहे. यानंतर आता हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. आज मध्यरात्रीपर्यंत हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील गोपालपूर आणि कलिंगपट्नम दरम्यान धडकणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एका व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये गोपालपूर किनारपट्टीवर साचलेलं ढग दिसत असून वेगवान वाऱ्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. अजून किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकलं नसताना देखील गोपालपूरमध्ये हवामानात तीव्र बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मंगळवारी, रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 29 सप्टेंबर पासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.