धक्कादायक ! महिलेने चक्क 10 लाखांत केला नवऱ्याचा सौदा
देश बातमी

धक्कादायक ! महिलेने चक्क 10 लाखांत केला नवऱ्याचा सौदा

जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूर याठिकाणी अजब लग्नाचा एक गजब प्रकार घडला आहे. जबलपूरच्या एका महिलेने चक्क आपल्या पतीला विक्रीसाठी काढलं आहे. दहा लाख रुपयांच्या हव्यासापोटी हा प्रकार घडला असून नवऱ्याने ही विक्री थांबावी म्हणून समुपदेशन केंद्रात धाव घेतली आहे. या अजब प्रकारामुळे समुपदेशन केंद्र देखील चक्रावले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कौटुंबिक समुपदेशन केंद्राला मिळालेल्या अर्जानुसार, जबलपूर येथील एका महिलेने चक्क आपल्या नवऱ्याचं लग्न एका दुसऱ्या मुलीशी ठरवलं. त्यासाठी एक लाख रुपये अॅडव्हान्सदेखील घेतले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून नवऱ्याने दुसऱ्या महिलेशी लग्न करावं म्हणून तिने तगादा लावला होता. त्यासाठीचे व्यवहारही तिने पक्के केले होते. हा बापुडवाणा नवरा जबलपूर येथील एका खाजगी शाळेत स्वयंपाकाचं काम करतो. या शाळेच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीला तो प्रचंड आवडायचा आणि तो मिळावा यासाठी आपण काहीही करू शकतो, असं ही श्रीमंत घरची मुलगी म्हणायची. ही गोष्ट या नवऱ्याच्या बायकोला कळली.

गेल्या काही महिन्यापासून पतीच्या मोबाईलवर अनोळखी नावाने सतत संदेश येत होते. त्यामुळे पत्नीने तो नंबर घेऊन संबंधित मुलीशी संपर्क साधला. ती महिला त्या मुलीला अनेक वेळा भेटली. या भेटीत तिने आपल्या पतीचा सौदा केला. त्यासाठी दहा लाख रुपये देण्याचंही ठरले. आपल्या पतीने त्या मुलीशी लग्न करावं म्हणून तिने तगादा लावला. हे लग्न झाल्यानंतर तिला नवऱ्याला सोडून द्यावं लागेल, याचा अंदाज असतानाही तिने हा सौदा केला होता. यासाठी तिने एक लाख रुपये अॅडव्हान्सही घेतले आहेत. ही घटना एखाद्या चित्रपटातील सिनेमापेक्षा कमी नाही. पैशांची अत्यंत निकड असलेल्या एका स्त्रीने 10 लाखांच्या हव्यासापोटी चक्क आपल्या पतीचा सौदा केला. 2 वर्षांच्या मुलीच्या या बापाने अखेर समुपदेशन केंद्रात धाव घेत आपला सौदा थांबवायचा विनवणी केली आहे.