विराटचा मोठा विक्रम ! असा रेकॉर्ड करणारा एकमेव भारतीय
क्रीडा

विराटचा मोठा विक्रम ! असा रेकॉर्ड करणारा एकमेव भारतीय

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत तिसऱ्या सामन्याआधीच २-० अशी विजयी आघाडी घेतल्याने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम केला आहे. ही सीरिज जिंकताच कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नवा विक्रम झाला आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीमने रविवारी ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या टी-20मध्ये 6 विकेटने पराभव केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याचसोबत भारताने टी-20 सीरिजही आपल्या नावावर केली. ही सीरिज जिंकताच कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नवा विक्रम झाला आहे. कोहलीने कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये टी-20 सीरिज जिंकण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम करणारा कोहली हा पहिला भारतीय कर्णधार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही टी-20 सीरिज जिंकण्याआधी भारताने सुरुवातीला न्यूझीलंडमध्ये 5-0 ने टी-20 सीरिज जिंकली होती. त्याआधी 2018 साली भारताचा इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत 2-1 ने विजय झाला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-20 8 डिसेंबरला होणार आहे. या मॅचमध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.