देशात 2020 मध्ये या 10 नेत्यांना केलंय सार्वाधिक सर्च; महाराष्ट्रातील एकमेव नेत्याचा समावेश
देश बातमी

देशात 2020 मध्ये या 10 नेत्यांना केलंय सार्वाधिक सर्च; महाराष्ट्रातील एकमेव नेत्याचा समावेश

नवी दिल्ली : 2020 हे वर्ष तसे कोरोनामुळे कायम लक्षात राहणार आहे. परंतु या वर्षात Yahooवर देशातील काही नेत्यांना मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातील एकमेव नेत्याचा समावेश आहे. त्या नेत्याचे नाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे आहे. तर या यादीत क्रमांक एकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील सर्च केले गेलेले टॉप 10 नेते

1) नरेंद्र मोदी : मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केले तेव्हा लोकांनी त्यांना सर्वाधिक वेळा सर्च केलं. यानंतर संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान मोदी Yahoo सर्चवर सर्वात वर राहिले.

2) राहुल गांधी : सर्वाधिक सर्च केलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी दुसर्‍या क्रमांकावर होते.

3) अमित शाह : या वर्षाच्या सुरुवातीस देशभरात सीएएच्या विरोधात आंदोलन सुरु असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चर्चेत आले होते. यानंतर जेव्हा अमित शहा यांना जेव्हा कोरोनाची लागण झाली तेव्हा देखील लोकांनी त्यांच्याबद्दल सर्च केले होते.

4) उद्धव ठाकरे : सप्टेंबरमध्ये कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यातील वादानंतर उद्धव ठाकरे यांना सर्च केलं गेलं.

5) अरविंद केजरीवाल : फेब्रुवारी महिन्यात निवडणुका घेण्यात आल्या आणि यावेळी अरविंद केजरीवाल यांचा मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले.

6) ममता बनर्जी : सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सहावा क्रमांक लागतो.

7) प्रणब मुखर्जी : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 31 ऑगस्ट रोजी निधन झाले. या दरम्यान, प्रणव मुखर्जी यांच्याविषयी बहुतेक गोष्टी सर्च करण्यात आल्या.

8) निर्मला सीतारमण : लॉकडाऊन दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पॅकेज जाहीर केले. यावेळी, त्यांना सर्वात जास्त सर्च करण्यात आले.

9) सोनिया गांधी : काँग्रेस पक्षातील नेतृत्त्वाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्ष म्हणून कायम राहतील, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यादरम्यान त्यांना मोठ्या प्रमाणावर सर्च करण्यात आला होता.

10) ज्योतिरादित्य सिंधिया : ज्योतिरादित्य सिंधिया यांना काँग्रेस सोडून यावर्षी होळीच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर देशभरात ते चर्चेत आले होते.