ईडीच्या कारवाईनंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
राजकारण

ईडीच्या कारवाईनंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली. त्यानंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो असं म्हणत मुंबईत सुंदरबाग सोसायटीने याचिका केली होती. कारखान्यामुळे त्यांनी ठेवलेल्या ठेवी अडचणीत आल्यात, असं याचिकेत म्हटलं होतं. त्यावेळी कारखान्यांना एक वर्षाची मुदत द्या आणि त्यांनी पैसे परत दिले नाही आणि थकवले तर ते कारखाने विक्रीला काढा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ज्या 14 कारखान्याची विक्री झाली त्यात जरंडेश्वर ही होता. कारखान्याची विक्री कायदेशीर झाली आहे. 12 किंवा 15 कंपन्यांनी टेंडर भरली होती. सर्वाधिक टेंडर भरलं गुरू कमोडिटीजनं होतं. त्यानंतर गुरू कमोडिटीजनं तो कारखाना विकत घेतला, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. त्यानंतर खूप याचिका झाल्या पण त्यांना त्यात अपयश आलं. त्यानंतर बिव्हिजीचे हनुमंत गायकवाड यांनी गुरू कमोडिटीजकडून तो कारखाना चालवायला घेतला पण त्यांना तोटा झाला. मग त्यांनी विकायला काढलेली कंपनी माझेच एक नातेवाईक राजेंद्र घाडगे यांनी घेतली. त्यांनाही दुसऱ्या तिसऱ्या वर्षी तोटा झाला, असं अजित पवारांनी सांगितलं.

विस्तार वाढ करण्यासाठी त्यांनी सगळ्या परवानग्या घेतल्या. दिस्तीलरी केली,कोजेन केलं, crushing capacity वाढवली. अनेक चौकशा झाल्या काही निष्पन्न झालं नाही. अजूनही अनेक याचिका आहेत त्यांच्या तारखा आहेत. Eowची पण चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. जरंडेश्वर शुगर मिल ही न्याय मागायला न्यायालयात जाईल. अनेक शेतकरी, हजारो कामगार, तोडणी मजूर अनेकांचं जीवन त्याच्यावर अवलंबून असल्याचंही अजित पवार म्हणाले.

आम्ही राजकीय व्यवस्थेत काम करत असताना आम्हाला ही कुटुंब प्रपंच आहे. जे पैसे 20 कोटी रुपये दिले ते चेकवर दिलेत कमाईचे पैसे आहेत असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला आहे. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांनी सांगितलं होत. मंत्री आणि पत्नीने संचालकांचे अधिकार सोडा. आम्ही तेव्हा सोडले होते. हा आरोप माझ्यावर आज नाही आधीपासून होतोय पण कारखाने विकायचे आदेश दिले होते. जनाधार ज्यांच्या मागे आहे ते काम करत राहणार किती ही चौकशा करा, असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.