शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत
राजकारण

शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत

पुणे : संजय राठोडांचा राजीनामा होतो आणि मुंडेंचा होत नाही. वाझेंना निलंबित केलं जातं देशमुखांना वाचवलं जातं. सरकारची प्रतिमा मुंडेंमुळं, देशमुखांमुळं डागाळली जात नाही का? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, प्रत्येक वेळेला राष्ट्रवादी तुमच्यावर दबाव निर्माण करत आहे, शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत. असंही चंद्रकांत पाटील म्हंटल आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना चंद्रकात पाटील म्हणाले की, परमबीर सिंह बोलले आहेत. अजून सचिन वझे बोलायचे आहेत, वझेही बोलतील. ते किती दिवस चूप बसणार?. उद्धव ठाकरे आमचे जुने मित्र आहेत. राठोड प्रकरणावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांचा राजीनामा घेतला. मग इतर प्रकरणावर ते गप्प का? सरकारचे पाय कुठे एकमेकांमध्ये अडकले आहेत? असा सवाल त्यांनी केला.

मी दोन दिवसांपूर्वीच म्हटलं होतं दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील. रोज नवी गोष्ट बाहेर येणार आहे. त्यातील एक अनिल देशमुखांचा राजीनामा आज झाला पाहिजे. असा इशाराही यावेळी पाटलांनी ठाकरे सरकारला दिला आहे. तसेच, आणखी एक मंत्री जे गृह विभागात हस्तक्षेप करत होते. त्यांचाही तुम्हाला राजीनामा घ्यावा लागेल, मला नावं घ्यायला लावू नका, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सगळं माहिती असतं, असं ते म्हणाले.

त्याचबरोबर, अनिल देशमुख आरोप फेटाळत असतील तर त्यांनी परमबीर सिंहांना आत घेऊन चौकशी करावी. वाझेंच्या स्टेटमेंटमध्ये नाव येतील म्हणून तुम्ही त्यांना पदावरुन काढलं. त्याआधी बरं चाललं होतं, हफ्ते, वाटे बरोबर पोहोचत होते. आता तुम्हाला परमबीर सिंह खोट बोलत आहेत असं वाटतंय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. येत्या आठवड्यात राष्ट्रपतींना राज्यपालांना रिपोर्ट द्यावा लागेल. राष्ट्रपती राजवट या ठिकाणी आणली पाहिजे, हा संघर्ष आता केवळ भारतीय जनता पार्टी पुरता मर्यादित राहिला नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आठवडाभरात मुंबईकडे येतील, असंही ते म्हणाले.