काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरूच; काय होणार?
राजकारण

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरूच; काय होणार?

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार या चर्चा सुरू होत्या. त्यावर ‘ मी असा काही निर्णय घेतला नाही,’ असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल्यानंतरही मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरूच आहेत. दरम्यान ही चर्चा दोन महिन्यापासून का होते आहे, हेच मला समजत नाही. कोण करते ही चर्चा, त्यावर एकदा स्पष्टीकरणही दिले आहे. तरीही ही चर्चा होतेच कशी असा प्रश्न मलाही पडला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटली, सरकारच्या अविश्वास ठरावाच्या वेळी वाहतुकीमुळे मतदान प्रक्रियेपर्यंत पोहोचू न शकल्याच्या योगायोगामुळे संभ्रमाच्या वाढत्या गुंत्यात अशोकराव चव्हाण यांच्यासारखा मोठा नेता अडकल्याचे चित्र अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे हा गुंता सुटावा म्हणून फारसे प्रयत्न होताना दिसत नसल्याने वाढलेला संभ्रम कालावधी जाणीवपूर्वक आहे का, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही चर्चेत आहे.

मात्र, अशोकराव चव्हाण यांच्याबाबत होणाऱ्या चर्चा वावड्या असल्याचे सांगत आमदार अमरनाथ राजूरकर म्हणाले, ‘चर्चा चुकीच्या आहेत. येत्या काळात राहुल गांधीसुद्धा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पक्षाचे सर्व कार्यक्रम नीट सुरू आहेत. त्यामुळे असे काही नाही.’ गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार या चर्चा सुरू होत्या. त्यावर ‘ मी असा काही निर्णय घेतला नाही,’ असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल्यानंतरही मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरूच आहेत.