भाजपनेत्या पंकजा मुंडे क्वारंटाईन, स्वत: ट्विट करून दिली माहिती
राजकारण

भाजपनेत्या पंकजा मुंडे क्वारंटाईन, स्वत: ट्विट करून दिली माहिती

मुंबई- राज्यात आज मतदान होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन झाल्या आहेत. याविषयी पंकजा यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. औरंगाबाद मतदार संघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा त्यांनी प्रचार केला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे. त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांनी ट्वीट करत रात्री उशिरा यासंदर्भातील माहिती दिली आहे.

 

याआधी त्यांनी सरकारच्या वर्षपूर्तीवर निशाना साधला होता.एक वर्ष पूर्ण होतं की नाही याबाबत सर्वांच्याच मनात संभ्रम होता. जनतेने बहुमत दिलेलं नसतानाही ते सत्तेत आहेत. त्यामुळे सत्ता टिकवणं हे त्यांचं ध्येय आहे असं मला वाटतं. जनतेचे हित दुय्यम अशी परिस्थिती असल्याची टीका पंकजा यांनी केली होती.