‘यामुळे’ उर्मिलाच्या शिवसेना प्रवेशाला लागतोय उशीर ?
राजकारण

‘यामुळे’ उर्मिलाच्या शिवसेना प्रवेशाला लागतोय उशीर ?

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरला होता. मात्र आपण पक्षप्रवेश करणार नसल्याचे स्वतः उर्मिलाने एका संकेतस्थळाला सांगितले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मात्र उर्मिला या शिवसेनेत येणार असून उद्या तो प्रवेश होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुख्यमंत्र्यांचे माध्यमप्रमुख हर्षल प्रधान यांनी उर्मिला मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी कलावंत श्रेणीतून उर्मिला यांच्या नावाची शिफारस शिवसेनेने केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप सरकारने पाठवलेल्या यादीवर शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे कदाचित उर्मिला शिवबंधन बांधण्याचे टाळत असावी, अशी चर्चा आहे.

दरम्यान आज पत्रकार परिषद घेऊन उर्मिला आपली भूमिका मांडणार आहे. या पत्रकार परिषदेत उर्मिला आपली पुढील राजकीय वाटचाल कशी आणि कोणत्या राजकीय पक्षातून असेल या संदर्भात  निर्णय जाहीर करणार आहे. तर उर्मिलाच्या प्रवेशाने शिवसेनेची महिला आघाडी आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.