भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच, मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट

बंगळुरू- लोकसभा असो वा एखाद्या राज्यातील विधानसभा निवडणूक भाजपकडून मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. आता या संदर्भात भाजपच्या एका मंत्र्याने मुस्लीम उमेदवार देणार नसल्याचे वक्तव्य केल्याने भाजपची मुस्लीम उमेदवारा संदर्भातील भूमिका स्पष्ट झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कर्नाटकमधील बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होणार आहे. याचसंदर्भात कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री भाजपनेते के. एस. ईश्वरप्पा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाजप पोटनिवडणुकीत कोणत्याही मुस्लीम उमेदवाराला तिकीट देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. बेळगाव हे हिंदूंचे केंद्र असून त्याचे समर्थन करणाऱ्यालाच तिकीट दिलं जाईल असं ईश्वरप्पा म्हणाले होते.

यावरून आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही बाब दुर्देवी आणि निंदनीय आहे. परंतु यात आश्चर्य वाटण्यासारख काहीही नाही. केवळ एकाच समुदायाकडे राजकीय शक्तीचे अधिकार आहेत, असं हिंदुत्वाला वाटतं. संविधानात स्वातंत्र्य, बंधूत्व, समानता आणि न्याय याबाबत सांगण्यात आलं आहे, असं ट्विट ओवेसी यांनी केले आहे.