उत्तराखंडनंतर भाजप आणखी एका राज्यात बदलणार मुख्यमंत्री?
राजकारण

उत्तराखंडनंतर भाजप आणखी एका राज्यात बदलणार मुख्यमंत्री?

बंगळुरू : भाजपने नुकतंच उत्तराखंडचे मुख्यमंत्री बदलले आहेत. त्यानंतर आता दक्षिणेतही मुख्यमंत्री बदलाची मागणी जोर धरू लागली आहे. कर्नाटकचे भाजप आमदार बसनगौडा यतनाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री शंभर टक्के बदलले गेले पाहिजेत, अशी मागणी केली आहे. यतनाल म्हणाले, की आम्ही या मुख्यमंत्र्यासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकत नाही. या गोष्टीची सरचिटणीस यांनाही कल्पना असेल, असंही ते म्हणाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुढे बोलताना यतनाल यांनी सांगितलं, की पक्षाला आपलं स्थान टिकवून ठेवायचं असेल तर मुख्यमंत्री बदलणं अत्यंत गरजेचं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसनं आपल्यापेक्षा खूप जागा कमी असलेल्या जनता दल सेक्यूलरसोबत गठबंधन करत सरकार स्थापन केलं होतं. कुमारस्वामी यांच्या राजीनाम्यानंतर भाजपनं कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केलं आणि बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री बनवलं.

मात्र, आता भाजपमध्येही मुख्यमंत्र्यांवरुन असंतोष असल्याचं चित्र आहे. अशात यतनाल यांनी मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच कर्नाटक उच्च न्यायालयानं येडियुरप्पा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या पुराव्याप्रकरणी तपासासाठी परवानगी दिली होती.