चंपा म्हणणं थांबवा अन्यथा… चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा
राजकारण

चंपा म्हणणं थांबवा अन्यथा… चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

पंढरपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा उल्लेख चंपा करण्यावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. चंपा उल्लेख करण्यावरुन आक्षेप नोंदवत यावरुन पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना संताप व्यक्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अजित पवार यांनी पंढरपुरात सभेत बोलताना पुन्हा एकदा चंपा असा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांना डिवचलं होतं. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो असा टोला त्यांनी लगावला होता.

अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचीसुद्धा जी शॉर्ट फॉर्म आहेत…त्यांच्या मुलापासून सर्वांची शॉर्ट फॉर्म मला करावी लागतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.