हाईरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये गायकवाड यांची नोंद
राजकारण

हाईरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये गायकवाड यांची नोंद

मुंबई : लातूर लोकसभेचे माजी खासदार डॉ. प्रा. सुनील बळीराम गायकवाड यांची हाईरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली आहे. डॉ. गायकवाड हे लातूर लोकसभेचे १६व्या लोकसभेत खासदार म्हणून मराठवाड्यातून सर्वाधिक मतांधिक्यानी भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर विजयी झाले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मा. खासदार डॉ. सुनील गायकवाड हे उच्च शिक्षित लोकप्रतनिधी म्हणून हाईरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये त्यांची नोंद झाली असून तसे प्रमाण पत्र “हाईरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस” नी आज (ता. १५) भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांना पाठवले.

या त्यांच्या वर्ल्ड रेकॉर्डबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. याच महिन्यात डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना “इंडियन स्टार अवॉर्ड”, “छत्रपती शिवाजी महाराज अवॉर्ड,” “बुध्दा पीस अवॉर्ड”म्यानमार, असे तीन नामांकित अवॉर्डस मिळाले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या मोहत्स्वानिमित्त त्यांची आणि त्यांच्या उच्च शिक्षणाची नोंद १६व्या लोकसभेतील उच्च शिक्षित सदस्य म्हणून करण्यात आली आहे.