पक्षप्रवेशाआधीच शिवसेनेच्या माजी आमदाराला भाजपकडून उमेदवारी जाहीर
राजकारण

पक्षप्रवेशाआधीच शिवसेनेच्या माजी आमदाराला भाजपकडून उमेदवारी जाहीर

नांदेड : भाजपने शिवसेनेला जोरदार झटका दिला आहे. भाजपने देगलूरमध्ये शिवसेनेच्या माजी आमदाराला गळ लावला आहे आणि उमेदवारीही जाहीर केली आहे. नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा कोविडनंतर १० एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा पक्षप्रवेश होण्याआधीच त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेनेसह महाविकासआघाडीसाठी हा झटका मानला जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेसने देवलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलालाच संधी दिली आहे. जगदीश अंतापूरकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. आता त्यांना भाजपच्या वतीने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे निवडणूक रिंगणात असतील. त्यामुळे देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

देशाच्या पंतप्रधानाला देखील काळे झेंडे दाखवले जातात. बिलोली तालुक्यातील हा प्रकार घडला. मला वाईट वाटलं. म्हणून मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 1984 पासून मी शिवसैनिक आहे. ज्या दिवशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक होणार होती त्या दिवशी आम्ही विधानसभेत मोडतोड केली होती. त्यामुळे १ वर्षासाठी आम्ही निलंबित झालो. ते दिवसही आम्ही पाहिले, असं मत सुभाष साबणे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं आहे.