राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४ हजारावर; १०० मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४ हजारावर; १०० मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असली तरी धोका मात्र टळलेला नाही. शिवाय कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. दररोज राज्यात आढळणारी नवीन कोरोनाबाधितांची संख्यी ही कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या तुलनेत कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ५ हजार ८११ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ४ हजार १४५ नवीन करोनाबाधित आढळून आले. तर, राज्यात आज १०० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ९५ हजार ७४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८६ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३ लाख ९६ हजार ८०५ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत एकूण १लाख ३५हजार १३९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. आता डेल्टा प्लसच्या रूग्णसंख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात डेल्टा प्लसचे दहा नवीन रूग्ण आढळून आले आहे. तर, यामुळे आता राज्यभरातील एकूण रूग्ण संख्या ७६ झाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ११ लाख ११ हजार ८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ९६ हजार ८०५ (१२.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ५३ हजार १२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ५३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६२ हजार ४५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.