मोठी बातमी! काँग्रेसचे २ बडे नेते शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणार?
राजकारण

मोठी बातमी! काँग्रेसचे २ बडे नेते शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणार?

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बडे नेते शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात येऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. काँग्रेसला मोठा झटका बसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळात विस्तारात काँग्रेसचे 2 माजी मंत्री शपथ घेऊ शकतात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काही आमदार, काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. हे सर्व भाजपात प्रवेश करणार असल्याचंही समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी भाजपला मतदान केलं होतं. यामुळे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. शिंदे सरकारच्या फ्लोअर टेस्टच्या वेळीही काँग्रेसचे 10 आमदार सभागृहात गैरहजर होते. यात अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. तेव्हापासूनच काँग्रेस आमदारांच्या नाराजीबाबतचं वृत्त समोर येत होतं.

अशातच आता काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसणार असल्याचं समोर येत आहे. काँग्रेस पक्षाला मागील काही वर्षांपासून झटक्यांवर झटके बसत आहेत. नुकतंच गुलाम नबी आझाद यांनीही राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला. काँग्रेसने भारत जोडो यात्रा करण्याआधी काँग्रेस जोडण्यासाठी काम करायला हवं, असं त्यांनी राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं होतं. आता आझाद यांचा हा सल्ला अगदी खरं असल्याचं आणखी एका बातमीमुळे सिद्ध झालं आहे.