राष्ट्रवादीच्या आमदारावर गोळीबार प्रकरण; मुलावर गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
राजकारण

राष्ट्रवादीच्या आमदारावर गोळीबार प्रकरण; मुलावर गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अण्णा बनसोडे यांच्या मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यावरच जबरदस्तीने कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केल्या प्रकरणी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करणारा तानाजी पवार हा AG इन्व्हायरो कंपनीचा कर्मचारी आहे. तसंच तो माजी सीआरपीएफ जवान आहे. आपल्या बचावासाठी अण्णा बनसोडे याच्यावर गोळीबार केला होता असा दावा तानाजी पवार याने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. याच परिसरात बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास तानाजी पवार याने अण्णा बनसोडे याच्यावर गोळीबार केला होता.

धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
दरम्यान अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. ज्या तानाजी पवार नामक व्यक्तीने गोळीबार केल्याचा आरोप केला जातोय त्याला आमदार अण्णा बनसोडेंच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली.