मोठी बातमी! शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाचाही प्रस्ताव ‘ही’ नावं ठरली, वाचा काय आहेत नावं
राजकारण

मोठी बातमी! शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाचाही प्रस्ताव ‘ही’ नावं ठरली, वाचा काय आहेत नावं

शिंदे गटाकडून (Shinde Group) तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सादर केल्यानंतर आता शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. आपल्या पक्षाच्या नावात बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यात
१. बाळासाहेब ठाकरे
२. बाळासाहेबांची शिवसेना
३. शिवसेना बाळासाहेबांची
अशा तीन नावांचा पर्याय देण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिंदे गटाची काल वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत देखील शिंदे गटाने नवीन चिन्ह आणि नावाबाबत चर्चा केली. बैठकीत निवडणूक चिन्हाबाबत शिंदे गटाचं तीन चिन्हांवर एकमत झालं. आज निवडणूक आयोगाकडे चिन्ह संदर्भात प्रस्ता सादर केला. यात त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा चिन्ह निश्चित करण्यात आली आहेत. यात त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही चिन्ह ठाकरे गटानेही दिली आहेत. त्यानंतर आता त्रिशूळ आणि उगवता सूर्य या चिन्हावर शिंदें गटानेही दावा केला आहे. त्यामुळे या चिन्हांवरुनही दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता आहे.