ठाकरे गटाकडे ‘वंचित’ तर शिंदे गटाकडे दलित पँथर? शिंदे गटातही हालचाली वाढल्या
राजकारण

ठाकरे गटाकडे ‘वंचित’ तर शिंदे गटाकडे दलित पँथर? शिंदे गटातही हालचाली वाढल्या

मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना युतीसाठी पुढे हात केला होता. त्यानंतर प्रकाश आबेडकर यांनीदेखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आंबेडकर आणि ठाकरे यांच्या भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आणण्याच्या प्रयोगावर विविध […]

मोठी बातमी! शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाचाही प्रस्ताव ‘ही’ नावं ठरली, वाचा काय आहेत नावं
राजकारण

मोठी बातमी! शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाचाही प्रस्ताव ‘ही’ नावं ठरली, वाचा काय आहेत नावं

शिंदे गटाकडून (Shinde Group) तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सादर केल्यानंतर आता शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. आपल्या पक्षाच्या नावात बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यात १. बाळासाहेब ठाकरे २. बाळासाहेबांची शिवसेना ३. शिवसेना बाळासाहेबांची अशा तीन नावांचा पर्याय देण्यात आला आहे. शिंदे गटाची काल वर्षा बंगल्यावर बैठक झाली. […]

पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगालाच घेऊ द्या, शिंदे गट एवढा हट्टाला का पेटलाय? वाचा २ कारणं
राजकारण

पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगालाच घेऊ द्या, शिंदे गट एवढा हट्टाला का पेटलाय? वाचा २ कारणं

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या सुनावणीचा निकाल आणखी लांबणीवर पडला आहे. शिंदे गटाने नुकतीच एक याचिका दाखल केली होती. यामध्ये निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी शिंदे गटाने (Eknath Shinde Camp) केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने २७ सप्टेंबरपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश […]

शिंदे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अर्ज, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
राजकारण

शिंदे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अर्ज, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची ओळख असलेला शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हायजॅक करण्याच्यादृष्टीने आता शिंदे गटाने निर्णायक पाऊल टाकले आहे. शिंदे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठीच्या परवानगीचा अर्ज मुंबई महानगरपालिकेकडे सादर केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून यापूर्वीच दसरा मेळाव्यासाठी (Dasra Melava) परवानगी मागण्यात आली होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने ही परवानगी रोखून धरली होती. […]

खातेवाटपावरून शिंदे गटात मोठा असंतोष? ३ कॅबिनेट मंत्री नाराज असल्याची माहिती
राजकारण

खातेवाटपावरून शिंदे गटात मोठा असंतोष? ३ कॅबिनेट मंत्री नाराज असल्याची माहिती

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपात शिंदे गटाच्या तुलनेत भाजपला महत्त्वाची खाती मिळाली आहेत. शिंदे गटातील अनेक मंत्र्यांची दुय्यम खाती देऊन बोळवण करण्यात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता संबंधित मंत्र्यांमध्ये नाराजी असून शिंदे गटाचे ३ कॅबिनेट मंत्री आपल्याला मिळालेल्या खात्याबाबत खूश नसल्याची माहिती समोर येत आहे. मनाजोगी महत्त्वाची खाती न मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

‘त्या’ वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज होण्याची भीती, भाजपची सारवासारव
राजकारण

‘त्या’ वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज होण्याची भीती, भाजपची सारवासारव

मुंबई : पनवेलमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी एक वक्तव्य केलं आहे. “आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले” असं चंद्रकांतदादा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद दिल्लीत उमटल्याचं पाहायला मिळतंय. पाटील यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गट […]