मला हृदयविकाराचा त्रास, मात्र ईडीने व्हेंटिलेशन नसलेल्या खोलीत ठेवलं; राऊतांचा आरोप
राजकारण

मला हृदयविकाराचा त्रास, मात्र ईडीने व्हेंटिलेशन नसलेल्या खोलीत ठेवलं; राऊतांचा आरोप

मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास व एफएसआयमधील कथित घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर कोर्टाने चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपत असल्याने राऊत यांना पुन्हा ईडी अधिकाऱ्यांकडून कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी राऊत यांनी कोठडीतील गैरसोयबद्दल तक्रार केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘मला ज्या ठिकाणी ठेवलं त्या ठिकाणी व्हेंटिलेशन नाही. तिथे मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे. मला हृदयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होतो. रात्री जिथे मला झोपायला देतात तिथेही तीच परिस्थिती आहे. हवा येण्याजोगी एकही खिडकी नाही,’ अशी तक्रार संजय राऊत यांनी केली. राऊत यांच्या या तक्रारीनंतर कोर्टाने याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावर राऊत यांना ठेवण्यात आलेल्या खोलीत एसी असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच मोकळी हवा असणाऱ्या खोलीत ठेवण्याची तयारीही दर्शवली आहे.