उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, पण पॅटर्न फेसबुक लाईव्हचाच
राजकारण

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, पण पॅटर्न फेसबुक लाईव्हचाच

मुंबई :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हचा नेहमीचा पॅटर्न बदलत ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामुळे केवळ एकतर्फी जनसंवाद न होता, पत्रकारांच्या प्रश्नांना ठाकरे सामोरे जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु उद्धव ठाकरेंनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणं टाळलं. शिवसेना, धनुष्यबाण निवडणूक चिन्ह ते शिंदे गट; अशा विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. मात्र पत्रकारांच्या मनातील प्रश्नांवर उद्धव ठाकरेंनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

गेले ८-१५ दिवस अव्याहत रीघ लागली आहे, त्यांच्याशी बोलत आहे. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्यांना मी मागे बोलले होतो, तुम्हाला काही वाटते की नाही, माशाच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत. वाईट मलाही वाटलं, भावना मलाही आहेत. मी माझ्या सैनिकांवर दडपण वाढेल, असं बोलत राहिलो तर योग्य नाही. दडपण हलकं करणं हे माझं काम आहे. ते करताना काही वेळेला गंमत सुचते, असं ठाकरे म्हणाले.

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत चर्चा सुरु आहे. कायद्याच्या दृष्टीने बघितलं, तर धनुष्य बाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, ती चिंता सोडा.माणसाची चिन्हंही लोक बघतात, लोक विचार करुन मतदान करतात. मागच्या काळात काय झालंय हे सांगितलं. याचा अर्थ चिन्ह सोडायचं असं नाही, मी कायदेतज्ज्ञांशी बोलून तुम्हाला सांगतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.