कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११मध्ये समजलं होतं; जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने खळबळ
राजकारण

कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११मध्ये समजलं होतं; जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने खळबळ

मुंबई : ”कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११मध्ये समजलं होतं, त्यामुळे कब्रस्थानासाठी जागा मिळाली आणि कब्रस्थान बांधून पूर्णही झाले,” असे धक्कादायक विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्याच्या या विधानावर आता सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकीकडे राज्यात वाढत्या कोरोनामुळे सगळ्याच्याच चिंतेत भर पडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुब्रामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये त्याचे संपूर्ण भाषण रेकॉर्ड झाले आहे. यात ते म्हणत आहेत की, ”कोरोनाच्या काळात जर आपल्याकडे हे कब्रस्थान नसते, तर शहराची काय परिस्थिती झाली असती, याची कल्पनाही करवत नाही. याचा विचार अल्लाने आधीच २०११ मध्ये करून ठेवला होता की, २०२० मध्ये कोरोना येणार आहे आणि हा कोरोना येण्यापूर्वी येथे कब्रस्थान बनले पाहिजे, म्हणूनच येथे कब्रस्थानासाठी २०११मध्ये जमीन मिळाली आणि २०१९ मध्ये कब्रस्थानाचे काम पूर्ण झाले,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर व जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक सुरू राहणार आहे. दुसरीकडे विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातही करोनाचा उद्रेक झाला असून, राज्य सरकार या तीन जिल्ह्यांत नाईट कर्फ्य लागू करण्याचा विचार करत आहे.

त्याचबरोबर राज्यातही पुन्हा काही प्रमाणात कोरोना प्रतिबंधक नियम लागू लागण्यात आले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. पुणे महानगरपालिका क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ”या अंतर्गत जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे सहावाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे शहर, आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शहरात रात्री ११ ते पहाटे सहादरम्यान संचारबंदी लागू राहील. पुण्यामध्ये हॉटेल सुरू ठेवण्यासाठी रात्री ११ पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. तसेच, शहरातील कोचिंग क्लासेस बंद राहतील. मात्र अभ्यासिका सुरू राहतील. तसेच महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच लग्नसोहळ्यासाठी केवळ २०० जणांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न/समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही लग्नाला परवानगी नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

तर पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचे सविस्तर आदेश लवकरच जारी केली जातील. उच्च शिक्षण घेणारे वर्ग अर्ध्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. तर कंटेन्मेंट झोनमध्ये वावर मर्यादित करण्यासाठी पत्रे लावले जातील. तसेच संचारबंदी लागू न करता नियंत्रित संचारावर भर दिला जाईल. या नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे.