ठरलं ! आयपीए 14चं आयोजन होणार भारतातच
क्रीडा

ठरलं ! आयपीए 14चं आयोजन होणार भारतातच

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं आयोजन भारतातच करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. साखळी सामन्यांचे आयोजन मुंबई आणि मुंबईलगत असलेल्या स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. मात्र अजूनही बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आयपीएलच्या 13व्या मोसमाला काही महिन्यांच्या विलंबाने सुरुवात झाली होती. या 13 व्या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. त्यामुळे या 14व्या मोसमाचं आयोजन भारतात होणार की आणखी कुठे, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला होता. मात्र आता 14वा मोसम भारतात खेळण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. या मोसमाला एप्रिल महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होऊ शकते.

मुंबईतील वानखेडे, बेब्रॉन स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम तर पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये हे साखळी सामने खेळले जाणार आहेत. तसेच अहमदाबादमधील मोटेरा आणि सरदार पटेल स्टेडियममध्ये बाद फेरीतील सामन्यांचं आयोजन केलं जाणार असल्याचं म्हटलं आहे.