बजरंग पुनिया जागतिक कुस्ती विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या बाहेर; हे आहे कारण
क्रीडा

बजरंग पुनिया जागतिक कुस्ती विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या बाहेर; हे आहे कारण

नवी दिल्ली : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया कुस्ती विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या बाहेर पडला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप २ ते १० ऑक्टोबर दरम्यान ओस्लो, नॉर्वे येथे आयोजित केली जाईल आणि प्रकृती पुन्हा नीट होईपर्यंत बजरंग प्रशिक्षण सुरू करू शकणार नाही. पुनियाला टोक्यो क्रीडा स्पर्धेतनंतर लिगामेंट टीअर उपचार करण्यासाठी सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बजरंगने अलीकडेच एमआरआय केले होते आणि ऑलिम्पिकच्या आधी जूनमध्ये रशियामध्ये झालेल्या दुखापतीची तीव्रता जाणून घेण्यासाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स मेडिसिन सेंटरचे प्रमुख डॉ. दिनशॉ पारदिवाला यांचा सल्ला घेतला होता.

बजरंगने सांगितले की, लिगामेंट मध्ये इजा झाली आहे आणि डॉ. दिनशॉ यांनी मला सहा आठवडे प्रकृती पुन्हा नीट होईपर्यंत आराम करण्यास सांगितले आहे. मी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. बजरंग म्हणाला की, “माझा हंगाम संपला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ही एकमेव मोठी स्पर्धा शिल्लक आहे. मात्र, मी या वर्षी कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही.