भारताचा शेवट गोड तर पाकिस्तानचा कडू; बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पराभव
क्रीडा

भारताचा शेवट गोड तर पाकिस्तानचा कडू; बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पराभव

नवी दिल्ली : बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा विजय झाला असला तरी पाकिस्तानला मात्र पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे भारताचा शेवट गोड तर पाकिस्तानचा कडू अशी म्हणण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंड संघानं पाकिस्तानचा १०१ धावांनी पराभव केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडनं १-० ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडनं दिलेल्या ३७३ धावांच्या विजयी लक्ष्यापुढे पाकिस्तान संघला २७१ धावांपर्यंत मजल मारता आली. फवाद आलम (१०२) आणि अझर अली (६०) यांचा अपवाद वगळता एकाही पाकिस्तानी फलंदाजला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडकडून टीम साऊदी, ट्रेंड बोल्ट, वॉग्नर, मिचेल सँटनर आणि जेमिनसन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

केन विलियम्सनच्या ( १२९) शतकाच्या आणि रॉस टेलर ( ७०), हेन्री निकोल्स ( ५६) व बी जे वॉटलिंग ( ७३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडनं पहिल्या डावात ४३१ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानला पहिल्या डावांत फक्त २३९ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडनं दुसरा डाव १८० धावांवर घोषित करुन पाकिस्तानला विजयासाठी ३७३ धावांचं लक्ष दिलं होतं. मात्र पाकिस्तानचा संघ २७१ धावांपर्यंत मजल मारु शकला. पाकिस्तान संघाकडून फवाद आलम यानं एकाकी झुंज दिली. फवादनं २००९ मध्ये पहिलं कसोटी शतकं झळकावलं होतं. त्यानंतर तब्बल ११ वर्षानंतर फवादला दुसरं कसोटी शतक झळकावता आलं आहे.