फुटबॉलपटू अर्जेन रॉबेनची दुसऱ्यांदा निवृत्ती; २०१९मध्ये पहिल्यांदा झाला होता निवृत्त
क्रीडा

फुटबॉलपटू अर्जेन रॉबेनची दुसऱ्यांदा निवृत्ती; २०१९मध्ये पहिल्यांदा झाला होता निवृत्त

नवी दिल्ली : नेदरलँड्स, बायर्न म्युनिक आणि चेल्सी क्लबचा दिग्गज खेळाडू अर्जेन रॉबेनने वयाच्या ३७व्या वर्षी व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. २०१९मध्ये बायर्न म्युनिक सोडल्यानंतर तो निवृत्त झाला, परंतु त्यानंतर २०२०मध्ये तो क्लब ग्रोनिंगेनमध्ये परतला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुखापतीमुळे रॉबेनने २०२०-२१च्या हंगामात क्लबसाठी फक्त सात सामने खेळले. गुरुवारी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून रॉबेनने आता आपल्या कारकिर्दीला कायमचा निरोप देत असल्याचे सांगितले. रॉबेन म्हणाला, प्रिय फुटबॉल चाहत्यांनो, मी माझी सक्रिय फुटबॉल कारकीर्द थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. एक अतिशय कठीण निवड आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो! रॉबबेनने पीएसव्ही आयंडोवेन येथे पहिल्या सत्रात आर्डीव्हिझी जेतेपद जिंकले आणि त्यानंतर प्रीमियर लीगची दोन विजेतेपदे, दोन लीग चषक आणि चेल्सीसह एफए चषक जिंकला. त्याने रिअल माद्रिदसह ला-लीगा ट्रॉफी जिंकली. बायर्न म्युनिकबरोबर त्याची कारकीर्द यशस्वी ठरली होती. या क्लबकडून खेळताना पाच जर्मन कप विजेतेपदे, चॅम्पियन्स लीग ट्रॉफी आणि बुंडेस्लिगाची आठ विजेतेपदे रॉबेनने आपल्या नावावर केली.

क्लब स्तरावरील यशाव्यतिरिक्त रॉबेनने नेदरलँड्सकडून ९६ सामने खेळले आणि ३७ गोल केले. २०१०च्या फिफा वर्ल्डकप फायनलमध्ये तो नेदरलँड्सकडून खेळला होता. या सामन्यात स्पेनने नेदरलँड्सचा पाडाव करत वर्ल्डकपवप नाव कोरले होते.