पुजाराचा आणखी एक विक्रम; दिग्गजांच्या पंक्तीत मिळाले स्थान
क्रीडा

पुजाराचा आणखी एक विक्रम; दिग्गजांच्या पंक्तीत मिळाले स्थान

सिडनी : बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारानं कसोटी सामन्यात सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. सहा हजार धावा पूर्ण करानारा पुजारा ११ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी नॅथन लायनच्या चेंडूवर एक धाव घेत पुजारानं सहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सिडनी कसोटी सामन्यात पुजारानं निर्णायक क्षणी ७७ धावांची खेळी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चेतेश्वर पुजारा आपल्या कारकिर्दीतीचा ८० वा सामना खेळत आहे. पुजारानं १३४व्या डावांत ४८ च्या सरासरीनं सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. यादरम्यान पुजारानं १८ शतकं आणि २७ अर्धशतकं झळकावली आहेत. २०६ ही पुजाराची सर्वोच्च धावसंख्या आहे.

१० वर्षांपूर्वी बंगळुरुमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात पुजारानं कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं. त्यानंतर १८ व्या डावात पुजारानं एक हजार धावांचा टप्पा पार केला होता. २००० धावांसाठी पुजाराला ४६ डाव लागले होते. तर ३००० धावांसाठी ६७ डाव, ४००० धावांसाठी ८४ डाव, ५००० धावांसाठी १०८ डाव आणि सहा हजार धावांसाठी १३४ डाव लागले आहेत.

आतापर्यंत ६००० धावा पूर्ण केलेले भारतीय खेळाडू
सचिन तेंडुलकर
राहुल द्रविड
सुनील गावसकर
व्ही व्ही एस लक्ष्मण
विरेंद्र सेहवाग
विराट कोहली
सौरव गांगुली
दिलीप वेंगसकर
मोहम्मद अजहरुद्दीन
गुंडप्पा विश्वनाथ