रोहित शर्माचा मोठा विक्रम; अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय
क्रीडा

रोहित शर्माचा मोठा विक्रम; अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धचा चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने एक खास विक्रम नोंदवला. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर रोहित झेल देऊन लवकर माघारी परतला असला तरी त्याने 12 धावा केल्या. या 12 धावांमुळे त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रोहितने 342 टी-२० सामन्यांत खेळताना 9000 धावा पूर्ण केल्या. यातील 2,800 धावा त्याने आंतराष्ट्रीय टी-20 सामन्यात केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा हिटमॅन जगातील नववा फलंदाज ठरला आहे. विराटच्या नावे 302 सामन्यात 9,650 धावा आहेत.

वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज ख्रिस गेल या विक्रमात अग्रेसर आहे. टी-20 क्रिकेटमध्ये गेलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. गेलने 13,720 धावा केल्या आहेत. गेलनंतर विंडीजचा कायरन पोलार्ड दुसऱ्या स्थानी असून त्याने टी-20मध्ये 10,629 धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक 10,488 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.