इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
क्रीडा

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणेच ही मालिकाही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळली जाईल. 23 मार्चपासून मालिकेला पुण्यात सुरवात होणार असून मालिकेचे तीनही सामने पुण्यातील गहुंजेच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली असून चौथ्या टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमारने अर्धशतक साजरे करत सर्वांना आपली नोंद घेण्यास भाग पाडले. विजय हजारे स्पर्धेत धावांची बरसात करणाऱ्या पृथ्वी शॉला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे. तर, आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेला गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

असा असे भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

सामन्यांचे वेळापत्रक
23 मार्च – पहिला सामना
26 मार्च – दुसरा सामना
28 मार्च – तिसरा सामना