इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा
क्रीडा

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची निवड करण्यात आली आहे. निवड समितीने इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांसाठी ही निवड केली आहे. भारतीय महिला संघ १६ जूनपासून ब्रिस्टॉल येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कसोटी मालिकेनंतर पहिला एकदिवसीय सामना २७ जून रोजी ब्रिस्टॉलमध्ये, दुसरा एकदिवसीय सामना ३० जून रोजी टाँटन येथे आणि तिसरा एकदिवसीय सामना ३ जुलै रोजी वॉरसेस्टर येथे होईल. यानंतर ९ ते १५ जुलै दरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल.

टी-२० मालिकेसाठी संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हार्लिन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक), शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव आणि सिमरन दिल बहादूर.

एकदिवसीय मालिकेसाठी संघ –
मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक) झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट आणि राधा यादव.

कसोटी मालिकेसाठी संघ –