स्मृती मंधानाची रेकॉर्डब्रेक खेळी; आफ्रिकेची धूळधाण
क्रीडा

स्मृती मंधानाची रेकॉर्डब्रेक खेळी; आफ्रिकेची धूळधाण

लखनौ : भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये झालेल्या पराभवानंतर दुसऱ्या मॅचमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताचा ९ गडी राखून विजय मिळवला आहे. भारताला या मॅचमध्ये विजयासाठी 158 रनचं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग टीमने फक्त 28.4 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्मृती मंधाना आणि पूनम राऊत या दोघींनी अर्धशतकं केली, तर झूलन गोस्वामीने 42 रन देऊन 4 विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाडला 3 विकेट घेण्यात यश आलं. भारतीय संघाच्या या विजयात स्मृती मंधानाने आक्रमक खेळी केली, सोबतच तिने विश्वविक्रमही स्वत:च्या नावावर केला. स्मृतीने 64 बॉलमध्ये नाबाद 80 रन केले, यात 3 फोर आणि 10 सिक्सचा समावेश होता. मंधानाचा स्ट्राईक रेटही 125 चा होता. तर पूनम राऊतने 89 बॉलमध्ये नाबाद 62 रनची खेळी केली.

मंधानाने लागोपाठ 10व्यांदा आव्हानाचा पाठलाग करताना 50 पेक्षा जास्त रन केले आहेत. हा रेकॉर्ड करणारी ती जगातली पहिली क्रिकेटपटू आहे. 2018 पासून जेव्हा भारताने वनडे क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग केला, तेव्हा स्मृतीने 50 पेक्षा जास्त रन केले आहेत. पहिल्या वनडेमध्ये भारताचा 8 विकेटने पराभव झाला होता.