प्रदर्शित होताच सलमानच्या राधेने केला मोठा विक्रम
मनोरंजन

प्रदर्शित होताच सलमानच्या राधेने केला मोठा विक्रम

मुंबई : अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत भारतात हा चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. परदेशात हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाने एक नवा विक्रम केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ईदला प्रदर्शित झालेला सलमानचा राधे हा चित्रपट सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी ४.२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. सलमान खानने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

तुम्हाला ईदच्या खूप खूप शुभेच्छा. राधे हा चित्रपट पहिल्याच दिवशी सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. तुम्हा सर्वांचे आभार असे त्याने कॅप्शन दिले आहे. प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी यूएईमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाने यूएई आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकूण ४ लाख डॉलर म्हणजेच २.९४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने इतकी कमाई केल्यानंतर विकेंडला चित्रपट काय जादू करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता हा चित्रपट सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. चित्रपटात सलमानसोबत दिशा पटाणी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, गोविंदा, गौतम गुलाटी, प्रविण तरडे हे कालाकार दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवाने केले आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९मध्ये करण्यात आली होती. २०२०मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.