टीम इंडियाचा पुढील 2 वर्ष भरगच्च कार्यक्रम; पाहा संपूर्ण वेळापत्रक
क्रीडा

टीम इंडियाचा पुढील 2 वर्ष भरगच्च कार्यक्रम; पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिका सुरू असतानाच बीसीसीआयनं टीम इंडियाचं पुढील दोन वर्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पुढील दोन वर्ष भारतीय संघाचा भरगच्च कार्यक्रम बीसीसीआयने जाहीर केला आहे. भारतीय खेळाडूंना दोन आठवडे विश्रांती देण्याची मागणी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली आहे. मात्र बीसीसीआयनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आगामी 15 महिने भारतीय टीमला सतत क्रिकेट खेळायचं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना ब्रेकमुळे मागील वर्षी अनेक स्पर्धा, दौरे पुढं ढकलाव्या लागल्या आहेत. त्या स्पर्धा या कालावधीमध्ये होणार आहे. त्यामुळे भारतीय टीमला विश्रांती मिळणार नाही. 2021 ते 2023 या दोन वर्षांचं हे वेळापत्रक असून या कालावधीमध्ये भारतीय टीमला तीन वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे.

भारतीय टीमचं संपूर्ण वेळापत्रक
एप्रिल ते मे 2021 – इंडियन प्रीमियर लीग 2021
जून ते जुलै 2021 – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल(जून), भारत वि. श्रीलंका ( 3 वन-डे, 5 टी20), आशिया कप
जुलै 2021 – भारत वि. झिम्बाब्वे (3 वन-डे)
सप्टेंबर 2021 – भारत वि. इंग्लंड ( 5 टेस्ट)
ऑक्टोबर 2021 – भारत वि. दक्षिण आफ्रिका (3 वन-डे, 5 टी20)
ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2021 – ICC T20 वर्ल्ड कप
नोव्हेंबर ते डिसेंबर 2021 – भारत वि. न्यूझीलंड (2 टेस्ट, 3 टी20), भारत वि. दक्षिण आफ्रिका (3 टेस्ट, 3 टी-20)
जानेवारी ते मार्च 2022 – भारत वि. वेस्ट इंडिज (3 वन-डे, 3 टी20), भारत वि. श्रीलंका ( 3 टेस्ट, 3 टी20)
एप्रिल ते मे 2022 – इंडियन प्रीमियर लीग 2022
जुलै ते ऑगस्ट 2022 – भारत वि. इंग्लंड ( 3 वन-डे, 3 टी20), भारत वि. वेस्ट इंडिज ( 3 वन-डे, 3 टी20)
सप्टेंबर 2022 – आशिया कप
ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2022- ICC T20 वर्ल्ड कप
नोव्हेंबर ते डिसेंबर 2022 – भारत वि. बांगलादेश (2 टेस्ट, 3 वन-डे), भारत वि. श्रीलंका (5 वन-डे)
जानेवारी 2023 – भारत वि. न्यूझीलंड (3 वन-डे, 3 टी20)
फेब्रुवारी ते मार्च 2023 – भारत वि. ऑस्ट्रेलिया ( 4 टेस्ट, 3 वन-डे, 3 टी20)