जपानकडून टोकियोमध्ये आणीबाणी जाहीर
क्रीडा

जपानकडून टोकियोमध्ये आणीबाणी जाहीर

टोकियो : ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती असल्याने जपानमधील सरकारने या स्पर्धा संपेपर्यंत कोरोना आणीबाणी जाहीर केली आहे. हा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. २२ ऑगस्टपर्यंत आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना व्हायरसमुळे एक वर्ष ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता येत्या २३ जुलैपासून आठ ऑगस्टपर्यंत तिचे आयोजन होणार आहे. ही स्पर्धा सुरू असताना परदेशातील प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. आता सहा आठवड्यांची आणीबाणी जाहीर केल्यामुळे स्थानिक प्रेक्षकांना देखील प्रवेश मिळण्याची शक्यता कमी वाटते. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी सांगितले की, देशात भविष्यात करोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

टोकियो शहरातील नागरिकांना घरी राहण्यास आणि टीव्हीवर ऑलिम्पिक स्पर्धा पाहण्याचे आवाहन केले जाऊ शकते. बुधवारी शहरात कोरोनाचे ९२० नवे रुग्ण आढळले होते. गेल्या आठवड्यात ही संख्या ७१४ इतकी होती. ऑलिम्पिक स्पर्धा सुरू असताना प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा की नाही यासंदर्भातील निर्णय शुक्रवारी घेण्याची शक्यता आहे.