वा शार्दूल व्वा! ठोकलं सलग दुसरं अर्धशतक
क्रीडा

वा शार्दूल व्वा! ठोकलं सलग दुसरं अर्धशतक

ओव्हल : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या सामन्यात चौथ्या दिवसी सलामीवीर रोहित शर्माची शतकी खेळी आणि त्याला चेतेश्वर पुजाराची लाभलेली साथ इंग्लंडसमोर दमदार आव्हान देण्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली. या दोघांनंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी चौथ्या दिवशी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तासाभरात ख्रिस वोक्सने जडेजा (१७) आणि त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेला पायचित पकडले. रहाणेला भोपळाही फोडता आला नाही. चांगल्या फॉर्मात दिसत असलेल्या विराटला वैयक्तिक ४४ धावांवर मोईन अलीने बाद केले. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या ओव्हर्टनने विराटचा झेल घेतला. विराटने ७ चौकार लगावले. त्याननंतर पहिल्या सेशननंतर शार्दुल ठाकूर आणि ऋषभ पंत यांनी दमदार भागीदारी करत इंग्लंडला थकवले. शार्दुलने अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश करत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. जो रूटने शार्दुलला बाद केले. शार्दुलने ७ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा केल्या. शार्दुलनंतर ऋषभ पंतही अर्धशतक करून बाद झाला. पंतने ५० धावांच्या खेळीच ४ चौकार ठोकले.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
भारत : रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड : रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हर्टन, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.