BCCI चे डोळे उघडणार का? लंकेविरुद्धची मॅच सुरू असतानाच संघाबाहेर असलेल्या खेळाडूचे द्विशतक
क्रीडा

BCCI चे डोळे उघडणार का? लंकेविरुद्धची मॅच सुरू असतानाच संघाबाहेर असलेल्या खेळाडूचे द्विशतक

मुंबई: पृथ्वी शॉने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०२३ मधील पहिले द्विशतक आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दुसरे द्विशतक पूर्ण केले. मुंबईच्या या धमाकेदार फलंदाजाने आसामविरुद्ध एलिट ग्रुप मॅचमध्ये ही खेळी केली. आधी पृथ्वीने ९८ चेंडूत शतक पूर्ण केले. यात १५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. या खेळीत पृथ्वीने मुशीर खानसोबत १२३ धावांची भागिदारी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा करणाऱ्या पृथ्वीला भारतीय संघात संधी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अशात द्विशतक करून पृथ्वीने पुन्हा एकदा निवड समितीचा निर्णय चुकल्याचे दाखवून दिले. पृथ्वीला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतीय संघात स्थान मिळाले होते. तेव्हा पृथ्वी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

पृथ्वी शॉने २०१८ साली कसोटी पदार्पणात शतक झळकावले होते. पण जुलै २०२१ पासून तो संघाबाहेर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत झालेल्या मालिकेत तो संघात होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये पृथ्वी म्हणाला होता की चेतन शर्माच्या नेतृत्वाखाली निवड समितीचे मी पुन्हा लक्ष वेधून घेईन. या काळात पृथ्वीचा स्ट्राइक रेट ९३.४६ इतके होते. लंच ब्रेकपर्यंत पृथ्वी १०० धावांवर नाबाद खेळत होता. पृथ्वीने ही शतकी खेळी द्विशतकात बदलली. त्याने २३५ चेंडूत शतक पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पृथ्वीने २८३ चेंडूत २४० धावा केल्या होत्या. यात १ षटकार आणि ३३ चौकारांचा समावेश आहे. त्याच्या सोबतीला अजिंक्य रहाणे असून तो ७३ धावांवर नाबाद आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतकी चांगली फलंदाजी करून देखील पृथ्वीला भारतीय संघात स्थान का मिळत नाहीय याचे उत्तर कोणाकडेच नाही. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो ते पाहता टीम इंडियामध्ये त्याला संधी मिळाली पाहिजे. पाच कसोटीतील ९ डावात पृथ्वीने ४२.३८च्या सरासरीने आणि ८६.०४च्या स्ट्रइक रेटने ३३९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि २ अर्धशतक आहे.