पुन्हा होणार भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच, जाणून घ्या कधी, कुठे आणि केव्हा
क्रीडा

पुन्हा होणार भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच, जाणून घ्या कधी, कुठे आणि केव्हा

दुबई: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया कप २०२२ मध्ये हाँगकाँगचा १५५ धावांनी पराभव करून सुपर-४ मध्ये स्थान मिळवले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजीकरत १९३ धावा केल्या होत्या, उत्तरादाखल हाँगकाँगला फक्त ३८ धावा करता आल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्पर्धेत अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका यांनी याआधीच सुपर-४ मध्ये स्थान मिळवले आहे. आता यात पाकिस्तानचा देखील समावेश झाला आहे. पाकिस्तानच्या आजच्या विजयामुळे क्रिकेट चाहत्यांना एका आठवड्यात पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान ही हायव्होल्टेज मॅच पाहता येणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्ट्रेडियमवर गेल्या रविवारी या दोन्ही संघात लढत झाली होती. आता या रविवारी म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी पुन्हा त्याच मैदानावर दोन्ही संघ लढतील.

आशिया कप, सुपर-४ चे वेळापत्रक

०३ सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, शारजाह
०४ सप्टेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
०६ सप्टेंबर- भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
०७ सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
०८ सप्टेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
०९ सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, दुबई
११ सप्टेंबर- अंतिम लढत, दुबई

गेल्या रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेटनी पराभव केला होता. आता या रविवारी जेव्हा भारत मैदानात उतरेल तेव्हा रविंद्र जडेजा संघात नसेल. दुखापतीमुळे आशिया कपच्या उर्वरित लढतीसाठी तो मुकणार आहे. बीसीसीआयने जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश केला आहे.