तिसऱ्या कसोटीत ‘हा’ गोलंदाज करणार कसोटी पदार्पण; भारतीय संघ जाहीर
क्रीडा

तिसऱ्या कसोटीत ‘हा’ गोलंदाज करणार कसोटी पदार्पण; भारतीय संघ जाहीर

सिडनी : तिसऱ्या कसोटी सामन्यात युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आपलं कसोटी पदार्पण करणार आहे. सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयनं अधिकृत ट्विटर खात्यावर संघाची घोषणा केली आहे. अनुभवी रोहित शर्माचंही पुनरागमन झालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अनुभवी उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्याजागी तिसरा वेगवान गोलंदाज कोण? याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. एका जागेसाठी मुंबईकर शार्दुल ठाकूर, टी-नटराजन आणि नवदीप सैनी यांच्यामध्ये स्पर्धा होती. मात्र, अखेर नवदीप सैनीनं बाजी मारली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात सैनी आपल्या कसोटी कार्किर्दीला सुरुवात करणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात शमीला दुखापत झाल्यानंतर मोहम्मद सिरजला संघात स्थान देण्यात आलं होतं. सिराजनं दणक्यात कसोटी पदार्पण केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात उमेश यादवही दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे आता नवदीप सैनी कसोटी पदार्पण करत आहे. सैनीनं आतापर्यंत सात एकदिवसीय सामने आणि १० टी-२० सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ४६ प्रथम श्रेणी सामन्यात नवदीप सैनीनं १२८ विकेट घेतल्या आहेत.

असा आहे भारतीय संघ –
अजिंक्य राहणे (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी (पदार्पण)