कोहली, डीव्हिलियर्सच्या जोडीला आता मॅक्सवेल; लागली तब्बल एवढी बोली
क्रीडा

कोहली, डीव्हिलियर्सच्या जोडीला आता मॅक्सवेल; लागली तब्बल एवढी बोली

चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघात आता ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मॅक्सवेल आता संघाटे तगडे खेळाडू विराट कोहली आणि ए बी डिव्हिलिअर्ससोबत मैदानात उतरणार आहे. आरसीबी संघानं १४ कोटी २५ लाख रुपयांच्या किंमतीमध्ये मॅक्सवेलला खरेदी केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंजाब संघानं लिलावाआधी मॅक्सवेलला करारमुक्त केलं होतं. मॅक्सवेल पहिल्यांदाच आरसीबीच्या संघाकडून खेळताना दिसेल. विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स यांच्यासह आता विस्फोटक फलंदाज मॅक्सवेलही आरसीबीच्या चमूमध्ये जोडला आहे.

मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी धोनीच्या चेन्नई आणि विराटच्या आरसीबीमध्ये स्पर्धे लागली होती. मात्र, अखेर आरसीबीनं १४ कोटी २५ लाख रुपये खर्च करत मॅक्सवेलला खरेदी केलं आहे. ग्लेन मॅक्सवेलनं ८२ आयपीएल सामन्यात सहा अर्धशतकासह १,५०५ धावा चोपल्या आहेत. ९५ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. आयपीएलच्या लिलावापूर्वी मॅक्सवेलनं आरसीबीमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. डिव्हिलिअर्स आणि विराट कोहलीसोबत खेळण्याचा आनंद घ्यायचा असल्याचेही त्यानं म्हटलं होतं.