भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका; विजय मिळून देणारा खेळाडू आशिया कपमधून बाहेर
क्रीडा

भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका; विजय मिळून देणारा खेळाडू आशिया कपमधून बाहेर

दुबई: आशिया कप खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाने ग्रुप फेरीतील दोन्ही लढती जिंकून सुपर-४मध्ये प्रवेश केला. आता भारताची लढत रविवारी पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध होण्याची शक्यता आहे. अशात भारतासाठी एक वाईट बातमी आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय क्रिकेट संघातील स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजाला दुखापत झाली असून तो आशिया कपमधील उर्वरित सामन्यांसाठी संघाबाहेर झाला आहे. स्वत: बीसीसीआयने जडेजाच्या दुखापतीची माहिती दिली आहे. जडेजाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शानदार ३५ धावांचे योगदान दिले होते. त्याने हार्दिक पंड्या सोबत ५० धावांची भागिदारी करून संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले होते.