मुंबईला मोठा झटका; लिलावाआधीच स्टार खेळाडूने घेतला ब्रेक
क्रीडा

मुंबईला मोठा झटका; लिलावाआधीच स्टार खेळाडूने घेतला ब्रेक

मुंबई : गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघाला लिलावाआधीच मोठा झटका बसला आहे. लिलावासाठी काही मिनिटं शिल्लक असताना मुंबईच्या स्टार खेळाडूने मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे T-20 स्पर्धेतून ब्रेक घेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्ससमोर संघाचे समतोल राखण्याचं मोठ संकट उभ राहीलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकने मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे एक ब्रेक घेतल्याचे ठरवलं आहे. डीकॉकला यावेळी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे आता किती दिवस टी-२० स्पर्धेतून ब्रेक घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ब्रेक घेतल्यामुळे डीकॉक स्थानिक टी-२० सामन्यात खेळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे पण आयपीएल आयपीएलमध्ये खेळण्याबाबत अजुनही साशंकता असली तरी शक्यता कमी आहे.

यावेळी आयपीएल भारतात खेळवली जाण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामध्ये बायो-बबल देखील असणार आहे. या गोष्टीचा त्रास डीकॉकला पुन्हा होऊ शकतो अशी भीती डॉक्टरांना आहे त्यामुळे अजुनही आयपीएल मध्ये खेळण्याबाबत अजून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.