Road Safety Series: दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मोडला सेहवाग-सचिनचा विक्रम
क्रीडा

Road Safety Series: दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मोडला सेहवाग-सचिनचा विक्रम

रायपूर : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या १५व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका लीजण्डस संघाने बांगलादेश लीजण्डस संघावर १० गडी राखून मात मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना लीजण्डसने २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १६० धावा केल्या. मात्र, या धावा विजय मिळवण्यासाठी कमीच पडल्या. आफ्रिका लीजण्डसच्या सलामीवीरांनीच हे आव्हान पूर्ण केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बांगलादेशच्या १६१ आव्हानाच्या प्रत्युत्तरात खेळताना दक्षिण आफ्रिका लीजण्डसचे सलामीवीर अ‍ॅन्ड्र्यू पुटिक आणि मॉर्ने व्हॅन विक यांनी चांगली सुरुवात करत बांगलादेश लीजण्डसवर दबाव निर्माण केला. या दोघांनी १९.२ षटकांत संघाला जबरदस्त विजय मिळवून दिला. पुटिकने ५४ चेंडूंत ९ चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद ८२ तर मॉर्ने व्हॅन विकने ६२ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ६९ धावा केल्या. या दोघांनी स्पर्धेत आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी रचली आहे. पुटिक-विक यांनी रायपूर येथे झालेल्या पहिल्या सामन्याचा विक्रम मोडला. इंडिया लीजण्डसचे सलामीवीर सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी ११४ धावांची नाबाद भागीदारी केली होती.

तत्पूर्वी, या मालिकेच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ पहिल्या स्थानावर असून इंडिया लीजण्डसचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशवरील विजयामुळे आफ्रिकेने तिसरे स्थान मिळवले आहे. तर, इंग्लंड आणि वेस्ट इंडिंज यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर चौथ्या स्थानी कोण येणार, हे स्पष्ट होणार आहे.