भारत कि इंग्लंड कोण फायनलला हवं… सामनावीर ठरलेला रिझवान म्हणाला ‘भारत आला तर आमचं…’
क्रीडा

भारत कि इंग्लंड कोण फायनलला हवं… सामनावीर ठरलेला रिझवान म्हणाला ‘भारत आला तर आमचं…’

सिडनी : पाकिस्तानचा संघ आता फायनलमध्ये पोहोचला आहे. पण आता फायनलमध्ये कोणाचा सामना करायला आवडेल, असा प्रश्न सामनावीर ठरलेल्या मोहम्मद रिझवानला विचारला होता. त्यावेळी रिझवानने एक भन्नाट उत्तर दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

न्यूझीलंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी सलामी दिली. त्यामुळेच त्यांना या सामन्यात विजय साकारता आला आणि आता त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बाबर आझमने यावेळी ४२ चेंडूंत ५३ धावांची खेळी साकारली आणि ही खेळी महत्वाची ठरली. त्याला मोहम्मद रिझवानची चांगली साथ मिळाली, त्याने ५७ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच रिझवानला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

सामना संपल्यावर रिझवान म्हणाला की, ” आम्ही विश्वचषकातील पहिला सामना भारताबरोबर गमावला. आता आम्ही फायलनमध्ये पोहोचलो आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. आपल्या सर्वांना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या अॅशेल मालिकेबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण त्यापेक्षा जास्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने क्रिकेट विश्वाला जास्त आवडतात. त्यामुळे चाहत्यांना नक्कीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायला सर्वांना आवडेल. पण तुम्ही मला विचाराल तर या प्रश्नाचे उत्तर देणे सर्वात कठीण आहे. पण भारताबरोबर सामना झाला तर तो चांगलाच रंजक होऊ शकतो. भारत फायनलमध्ये आला तर आमचं काय होईल किंवा त्यांचं काय होईल, हे आता सांगता येणार नाही. पण हा सामना नक्कीच चांगला होईल”

विश्वचषकाच्या फायनलमध्ये सर्वात जास्त दडपण असते. विश्वचषकातील मोठ्या सामन्यांचे दडपण सर्वात जास्त असते आणि तेच सामना गमवायचे कारण ठरू शकते. त्यामुळे जर फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडचा सामना करावा लागला असता. त्यामुळे भारतावर जास्त दडपण येऊ शकले असते. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आता ज्या फायनल झाल्या आहेत, त्यामध्ये भारताचे पारडे जड आहे. त्यामुळे पाकिस्तान फायनलमध्ये येणं हे भारताच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे भारतासाठी पाकिस्तानने फायनलमध्ये येणं हे भारतासाठी नक्कीच चांगलं असेल. पण त्यापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर सर्वांचे लक्ष असेल.