काबूल विमानतळावर मोठा स्फोट; अनेकजण मृत्यूमुखी
बातमी विदेश

काबूल विमानतळावर मोठा स्फोट; अनेकजण मृत्यूमुखी

काबूल : अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दहशतीचं वातावरण कायम आहे. अशात अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी हल्ले झाले आहेत. या हल्ल्याची खात्री पेंटागन प्रवक्त्यांनी केली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दोन हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर तीन अमेरिकन सैनिकांसह १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि […]

तालिबानच पाकिस्तानला काश्मीर मिळवून देईल; पाकिस्तानी नेत्याचा दावा
बातमी विदेश

तालिबानच पाकिस्तानला काश्मीर मिळवून देईल; पाकिस्तानी नेत्याचा दावा

इस्लामाबाद : तालिबान पाकिस्तानसाठी आपली ताकद वापरून काश्मीर पाकिस्तानला मिळवून देईल, असा दावा पाकिस्तानी नेत्याने दावा केला आहे. इम्रान खान यांचा पक्ष तहरीक-ए-इन्साफ आणि तालिबानी यांच्यात दृढ संबंध असल्याचं यापूर्वीही जाहीर झालं आहे. आता पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्या नीलम इरशाद यांनी तालिबान्यांच्या मदतीनं लवकरच काश्मीर जिंकून घेण्याचा दावा केला आहे. तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या नेत्या […]

अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांबाबत तालिबानचा मोठा निर्णय
बातमी विदेश

अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांबाबत तालिबानचा मोठा निर्णय

तालिबानने जवळपास संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. लवकरच तालिबान त्यांच्या स्वतःच्या कायद्यानुसार राज्य करेल. दरम्यान, तालिबानने श्रीलंकेला आश्वासन दिले आहे की, त्यांच्या सरकार अंतर्गत अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांचे कोणतेही नुकसान होणार नाही. ‘डेली मिरर’ नुसार, तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की तालिबानचा LTTE म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमशी कोणताही संबंध नाही. आम्ही एक स्वतंत्र शक्ती […]

दानिश सिद्दीकीच्या हत्येमागे आमचा हात नाही, तालिबानकडून खेद व्यक्त
बातमी विदेश

दानिश सिद्दीकीच्या हत्येमागे आमचा हात नाही, तालिबानकडून खेद व्यक्त

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात भारतीय पत्रकार – छायाचित्रकार दानिश सिद्दीकी याचा नुकताच मृत्यू झाला आहे. दानिशच्या मृत्यूवर पहिल्यांदाच तालिबानची भूमिका समोर आली असून तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद यानं एका टीव्ही चॅनलशी बोलताना, तालिबानचा दानिशच्या हत्येमागे कोणताही हात नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दानिश सिद्दीकी याचं पार्थिव शरीर ‘इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस’ला सोपवण्यात आलं आहे. […]