काय आहे कारण? पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ऑफिस बंद करायची वेळ
कोरोना इम्पॅक्ट बातमी

काय आहे कारण? पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ऑफिस बंद करायची वेळ

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर त्यांचं ऑफिस बंद करायची वेळ आली आहे. बोर्डाचा एक वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे सोमवारी लाहोरमधलं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं मुख्यालय बंद करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. याआधी सहा क्रिकेटपटू आणि एका सहकाऱ्याला कोरोना झाल्यामुळे पाकिस्तान सुपर लीगही स्थगित करण्यात आली होती. यानंतर […]

पाकिस्तानी गोलंदाज करतात वयचोरी; माजी गोलंदाज आसिफने केली पोलखोल
क्रीडा

पाकिस्तानी गोलंदाज करतात वयचोरी; माजी गोलंदाज आसिफने केली पोलखोल

कराची : पाकिस्तान क्रिकेट संघातील गोलंदाज वयचोरी करत असल्याचा धक्कादायक आरोप संघाचा माजी गोलंदाज मोहम्मद आसिफने केला आहे. ते फक्त कागदावर तरुण आहेत. मात्र वास्तविकपणे त्यांचे वय जास्त आहे, असे आसिफने म्हटले आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजाचं कागदावर वय १७-१८ असते. मात्र त्यांचं खरं वय २७-२८ वर्ष असते, पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कमरान अकमल याच्या यु-ट्यूब चॅनलवर चर्चा […]

कोरोनाचे नियम मोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची हकालपट्टी
क्रीडा

कोरोनाचे नियम मोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची हकालपट्टी

कोरोनाचे नियम तोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू रझा हसन याची कोविड-१९चे नियम मोडल्याप्रकरणी स्थानिक टी-२० स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली. पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या Quaid-e-Azam ट्रॉफीत रझा हसन सहभागी झाला होता. संघाच्या मेडीकल टीमची परवानगी घेतल्याशिवाय रझा हसन बायो सेक्युर बबल मोडून हॉटेलबाहेर गेला. रझा हसनचं […]