कोरोनाचे नियम मोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची हकालपट्टी
क्रीडा

कोरोनाचे नियम मोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची हकालपट्टी

कोरोनाचे नियम तोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू रझा हसन याची कोविड-१९चे नियम मोडल्याप्रकरणी स्थानिक टी-२० स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली. पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या Quaid-e-Azam ट्रॉफीत रझा हसन सहभागी झाला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संघाच्या मेडीकल टीमची परवानगी घेतल्याशिवाय रझा हसन बायो सेक्युर बबल मोडून हॉटेलबाहेर गेला. रझा हसनचं हे वागणं सध्याच्या काळात योग्य नसल्याचं म्हणत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने त्याची स्पर्धेतून हकालपट्टी केली आहे. वारंवार सूचना देऊनही रझा हसनने नियमांचं उल्लंघन केले. ही खरंच शरमेची बाब आहे. आपला आणि आपल्यासोबत इतर सहकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात घालत रझा हसन हॉटेलबाहेर गेला. ज्यामुळे त्याची हकालपट्टी करण्यात आली असून तो उर्वरित हंगामात सहभागी होऊ शकणार नाही.

२०१२ साली रझा हसनने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. २०१२ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याची पाकिस्तानच्या संघात निवड झाली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात रझा हसनने ४ षटकांत १४ धावा देत २ बळी घेतले होते. शेन वॉटसन आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांचा रझाने बळी घेतला होता.